प्रखर राष्ट्रभक्त, मानवधर्माचे प्रचारक, सर्वसमावेशकतेचे पुरस्कर्ते…भजन, व्याख्याने आणि आपल्या विपुल लेखनातून ग्रामोन्नतीद्वारे राष्ट्रोद्धाराचा मार्ग प्रशस्त करणारे, साधे पण उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज…!
'गुरुदेव सेवा मंडळे', स्थापोनिया सुखवी सदा । सांगे बहुता 'कार्य है, करण्यास या रे !" सर्वदा ॥ नच स्थीर राहे एकसा, फिरतो स्वकार्या क्षणक्षणा ॥ घे ईश्वरी आदेश हा, करि सामुदायिक प्रार्थना ॥ - वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज